Surprise Me!

सुप्यात ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद | RoadAccident

2026-07-27 13 Dailymotion

सुप्यात ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद | RoadAccident

#Supa #RoadAccident #AccidentNews #CCTV #CCTVFootage #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #Ahmednagar #TruckAccident #BikeAccident #LatestNews #Lokmat #LokmatNews #accidentupdate

बारामती तालुक्यातील सुपे येथे मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे आणि शुभम दत्तात्रय ठोंबरे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही सुपे परिसरातील शेंडगेवाडी येथील रहिवासी होते. रविवारी दुपारी घडलेल्या या अपघाताचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि शुभम हे दोघे भाऊ दुचाकीवरून आपल्या घराकडे निघाले होते. बारामती तालुक्यातील सुपे-चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकात ते पोहोचले. चौकातून वळण घेत असताना अचानक त्यांच्या दुचाकीचे संतुलन बिघडले आणि दुचाकी रस्त्यावर घसरली. दुचाकी घसरल्यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी मोरगावच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक तेथून जात होता.
घटना काही क्षणांत घडल्याने दोन्ही भावांना स्वतःला सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही. रस्त्यावर पडल्यानंतर मालवाहतूक ट्रकचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम ठोंबरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शुभम यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.